
अकोट प्रतिनिधी :-प्रभाकर बोरकर
अकोट नेपाळ युथ स्पोर्ट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय तायकांडो चॅम्पियनशिप 2025- 26 चे पोखरा शहर नेपाळ येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरता भारताच्या विविध राज्यांमधून व अनेक देशाच्याविद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विदर्भातील अकोट तालुक्यामधून सेंट पॉल्स अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांनी चि. चेतन शरद घुगे याला सुवर्णपदक प्राप्त तर वेदांत श्रीकृष्ण काकड. रजत पदकाचे मानकरी ठरले आहेत. त्यामुळे अकोट तालुक्यात त्यांच्यावर संस्थेकडून व आप्तजनांकडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. भारतचे प्रतिनिधित्व करतउत्कृष्ट डावपेच चतुराई पूर्वकखेळाचै प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत.विदर्भातील महत्त्वपूर्ण सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलेआकोट शहर त्यामधील सर्व कलागुणांनी ओत पोत भरलेले सर्व गुण संपन्न असेप्रशिक्षक श्री अनुप बाळासाहेब चांदणे यांच्या तालमीमध्ये शिस्तबद्ध वतांत्रिक कौशल्य आणिआत्मविश्वास या प्रेरणेतून घडलेले विद्यार्थी यांनी तायक्वांदो चॅम्पियनशिप मध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोट शहराचेनाव पोचविले त्याबाबत आकोट शहरांमधून विद्यार्थ्यांचव सेंट पॉल्स अकॅडमी अकोट यांची तोंड भरून कौतुक करण्यात येत आहे.
या यशाबद्दल विजेत्या सर्व खेळाडूंचे, त्यांच्या आई-वडिलांचे, संस्थेचे अध्यक्ष नवनीतजी लखोटिया व उपाध्यक्ष प्रमोदजी चांडक , प्राचार्य विजयजी बिहाडे, प्रशिक्षकांचे तसेच क्रीडाप्रेमी नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.