
तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा या शाळेतील विद्यार्थी एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा करीता बसले होते यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या संपादन केले आहे या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन सुरेशदादा खोटरे कार्यकारिणी सदस्य,सर्व आजिव सदस्य ,सर्व शाळा समिती सदस्य, उद्धवराव विखे शाळा तपासणी अधिकारी, विलासराव गावंडे मुख्याध्यापक यांनी केले आहे
विशेषता सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील असून कला या विषयात त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे त्याबद्दल माता पालक मंडळ यांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले आहे
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिक्षक शांतीकुमार सावरकर, श्रीधर लोखंडे कु.प्रियंका नंदाने यांनी केले आहे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सर्व स्तरावरून होत आहे.