
तेल्हारा ता,प्रतिनिधी ….नंदकिशोर नागपुरे
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आकांक्षा कॉलेज ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हिवरखेड 11145 येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी ग्रामीण भागातील पत्रकारांना आधुनिक युगाशी जोडण्यासाठी संस्थेच्या वतीने 60 हजार रुपये मूल्याचे विशेष संगणक साक्षरता प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली. संस्थेचे संस्थापक स्व. बंडू उपाख्य बाळासाहेब लहाने यांच्या स्मृती प्रित्यर्थ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले . ग्रामीण भागातील पत्रकार बंधूंना तंत्रज्ञानाचे बळ मिळावे या उद्देशाने ग्राफिक्स डिझायनिंग आणि डीटीपी या कोर्सेस चे प्रशिक्षण दिले जाणार आहे हे प्रशिक्षण आकांक्षा कॉम्पुटर हिवरखेड येथे देण्यात येणार आहे. याकरिता संस्थेच्या वतीने कार्यरत उत्कृष्ट अशा दहा पत्रकारांना हे प्रशिक्षण देण्याचे नियोजित आहे. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. मयूर लहाने यांचे असून या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आकांक्षा कॉलेज ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या केंद्र संयोजिका प्रा. वैष्णवी लहाने यांनी केले आहे. आजच्या डिजिटल युगात बातम्यांचे संकलन आणि सादरीकरण करताना पत्रकारांना संगणकाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे हा विचार या उपक्रमामागे आयोजकांनी ठेवला आहे. या सोहळ्यात परिसरातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्यात प्रामुख्याने धीरजजी बजाज, सतीशजी इंगळे, अर्जुनजी खीरोडकार, जमीरुद्दीन (जमीरभाई), गजाननजी राठोड, गणेशजी सुरजोशी, जितेशजी कारिया, मनोजजी भगत, प्रशांतजी भोपळे, रितेशजी टीलावत, बलराजजी गावंडे, जितेंद्रजी लाखोटीया, केशवजी कोरडे, प्रेस क्लब, आदर्श पत्रकार संघ, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, या सर्वांचा सन्मान करण्यात आला तसेच या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्व पत्रकारांना त्रिवार वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार केशवजी कोरडे तर आभार डॉ मयूर लहाने यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वैष्णवी लहाने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.