
विलास बेलाडकर
तेल्हारा प्रतिनिधी:
जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा उकळी बु। ता. संग्रामपूर जि. बुलढाणा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, वर्ग आठवीच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेऊन संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. पूर्वी तायडे वर्ग आठवा तर प्रमुख अतिथी कु. जोया पटेल वर्ग सहावा या विद्यार्थिनी होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तेव्हा वर्ग एक ते आठच्या मुला मुलींनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गजेंद्र सुलतान, भिमराव परघरमोल, दिपाली तायडे या शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला केशव डाबेराव मुख्याध्यापक, शंकर बगाडे प्रवीण कुमार लिंगोट या शिक्षकांसह ज्ञानेश्वर फाळके यांची पालक म्हणून तर अंगणवाडी ताईंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन आणि नियोजन कु. कोमल पिंजरकार व कु. दिशा तायडे वर्ग आठवा या विद्यार्थिनींनी केले. तर आभार प्रदर्शन कु. ईश्वरी वरटकार या विद्यार्थिनीने केले. विद्यार्थिनींचे गावात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.