
तेल्हारा प्रतिनिधी :-
तेल्हारा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्रारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा व श्रीमती पार्वती देवी तापडिया काॅन्हेट तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे दि २५डिसेबर ते १जानेवारी पर्यंत विविध क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, तालुका रंग भरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
दि 1जानेवारी ला बक्षीस वितरण समारोप आयोजित करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अॅड जयवंतराव उपाख्य भैय्यासाहेब पाटील पुसदेकर उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे होते यावेळी कार्यक्रमाचे अतिथी म्हणून श्री प्रा केशवराव गावंडे कार्यकारिणी सदस्य, श्री प्रा सुभाषराव बनसोड कार्यकारिणी सदस्य श्री
सुरेशदादा खोटरे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून सर्व श्री आजिव सदस्य प्रा अण्णासाहेब ढोले, श्री दादासाहेब पाटील, श्री बाळासाहेब पाटील, श्री साहेबराव सोनमाळे श्री अॅड विश्वासराव नेरकर श्री रमेश पाटील कोकाटे , श्री शोएब अली मिर साहेब, श्री माधवराव खोटरे श्री पुरूषोत्तम पाटील दहे, श्री नारायण देवतळे तसेच विशेष निमंत्रित शाळा समिती सदस्य श्री सुधीर बापू देशमुख श्री शामशिल भोपळे व श्री उद्धवराव विखे शाळा तपासणी अधिकारी, श्री अनिल भाऊ भोपळे, प्राचार्य डॉ गोपाल ढोले,प्रा उदय देशमुख, श्री विलास गांवडे मुख्याध्यापक, सौ विद्या ताई देशमुख मुख्याध्यापिका , श्री बाळासाहेब सरनाईक अकोला श्री धनंजय भंगाळे जयंती उत्सव प्रमुख, श्री सुनील वंजारी शिक्षक प्रतिनिधी श्री विजय दहे शिक्षकेतर प्रतिनिधी, आकाश गवारगुरु रोहित वानखडे कु आरती तायडे प्रज्ञा गवारगुरू विद्यार्थी प्रतिनिधी सर्व माजी प्राचार्य शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी पञकार मंडळी उपस्थित होती
उपस्थित सर्व आजिव सदस्य यांचा सत्कार उपस्थित कार्यकारिणी मंडळ श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विलास गांवडे मुख्याध्यापक यांनी केले आहे, श्री प्रा सुभाषराव बनसोड, श्री प्रा केशवराव गावंडे, श्री सुरेशदादा खोटरे यांनी मनोगत व्यक्त केले आहे कार्यक्रम चे अध्यक्ष श्री भैय्यासाहेब पाटील पुसदेकर यांनी सांगितले की डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शैक्षणिक कार्यासाठी स्वतःला झोकून देऊन एक लढा उभा केला आहे या लढाचे योगदान मिळाले आहे यामुळे बहुजन समाजाला शिक्षणाचे माध्यम मिळाली आहे व नवी दिशा मिळाली आहे असे म़ोलाचे मार्गदर्शन केले आहे तसेच सर्व विजयी खेळाडू व सांस्कृतिक कार्यक्रम,रंगभरण स्पर्धा, गुणवत्ता धारक विद्यार्थी यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले आहे . कार्यक्रम चे सुञसंचालन श्री शांतीकुमार सावरकर यांनी केले आहे तर आभार प्रदर्शन सुनील वंजारी यांनी केले आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शांतीकुमार सावरकर सुनील वंजारी, बळीराम कुवारे तूषार जाधव अंकेश भांबुरकर बी जी पवार, धनंजय भंगाळे भारत भोयर श्रीधर लोखंडे गाढवे सर अभिजित हिंगणकर, सौ शर्वरी हिंगणकर कु प्रियंका नंदाने मॅडम गजानन गावंडे विजय दहे तेजराव कडू, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.