
तेल्हारा ता. प्रतिनिधी…नंदकिशोर नागपुरे
हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मयूर लहाने यांची महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे संपन्न झालेल्या शासकीय शिक्षक, अधिकारी व कर्मचारी विभागीय शोधनिबंध स्पर्धेत गुणवत्ता संपादन करून त्यांच्या शोधनिबंधाने राज्यस्तरावर स्थान मिळवले आहे. डॉ. लहाने हे स्वतः लेखक व समीक्षक आहेत. त्यांचे विविध पुस्तके व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित आहेत ते एका आंतरराष्ट्रीय मासिकाचे संपादक सुद्धा आहेत. त्यांनी बालभारती पुणे येथे मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कामकाज सुद्धा सांभाळले आहे. तसेच ते जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य सुद्धा आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या संशोधनाचा दांडगा अनुभव आणि लेखन शैली यांच्या जोरावर त्यांनी विभागातील 29 तज्ञ संशोधकांना मागे टाकत राज्यस्तरीय स्पर्धेत झेप घेतली आहे. या यशाचे श्रेय ते आपल्या सर्व विद्यार्थ्यांना समर्पित करीत आहे.