
उमरी (येडे) येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी श्रम संस्कार शिबिराचा समारोप सचिन महाजन :-हिंगणघाट प्रतिनिधी. हिंगणघाट- स्थानिक रा.सुं.बिडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हिंगणघाट,येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर ग्राम उमरी (येडे) येथे दिनांक 18 ते 24-डिसेंबर-2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले. शिबिराची सुरुवात गुरुवार दिनांक-18 डिसेंबर- 2025 झाली. पहिल्या दिवशी शिबिरार्थीचे आगमन, शिबिराची पूर्वतयारी, परिसर स्वच्छता व कार्य नियोजन करण्यात आले. शुक्रवार दिनांक-19 डिसेंबर-2025 ला सायंकाळी 5.00 वाजता शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला.या उद्घाटनिय कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक मा.प्रा.डॉ. उषाकिरण थुटे (अध्यक्ष ग्रा.वि.सं. हिंगणघाट) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. बालाजी राजुरकर, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा.डॉ. शरद विहीरकर (IQAC समन्वयक) कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री. प्रमोदरावजी येडे (सरपंच उमरी येडे) मा. कु.सुरेखा उईके (उपसरपंच) मा.श्री. दुशांत चौके (प्रभारी मुख्याध्यापक) मा. श्री.अरुण फुलकर (पोलीस पाटील) मा. श्री.भास्कर येडे (तंटामुक्ती अध्यक्ष) मा. श्री.मोहन येडे (शाळा समिती अध्यक्ष) मा.श्री. रविकिरण गरडे (ग्रामसचिव), सर्व ग्रामपंचायत सदस्य, व गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक (कार्यक्रम अधिकारी) डॉ. कमलकिशोर इंगोले, सूत्रसंचालन कु. तेजस्विनी डोफे, डॉ गजानन ठक व डॉ. श्रुती घरडे (सह- कार्यक्रम अधिकारी) यांनी आभार व्यक्त केले. शनिवार दिनांक 20- डिसेंबर-2025 ला सकाळी 6.00 ते 7.30 दिवसाची सुरुवात योग व प्राणायमाने झाली. त्यानंतर सकाळी 9.00 ते 11.00 या वेळात श्रमदान करून भोजन व विश्रांती करण्यात आली. दुपारी 2.00 ते 3.00 या कालावधीत प्रथम सत्र बौद्धिक उपक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त “अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन” या वैचारिक व्याख्यानामध्ये मार्गदर्शक म्हणून मा. गजेंद्र सरकार (कार्याध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र प्रदेश) तसेच या सत्राच्या अध्यक्ष डॉ. जया जॉन ह्या होत्या. या बौद्धिक सत्राचे प्रास्ताविक श्री.साहिल मेंढे, सूत्रसंचालन कु. ऋतुजा मेश्राम व हेमंत जामुनकर यांनी आभार मानले. द्वितीय बौद्धिक सत्र 3.30 ते 4.30 यामध्ये “संत गाडगेबाबा एक कर्मयोगी” या वैचारिक व्याख्यानामध्ये मार्गदर्शक म्हणून डॉ. अनिल बाभळे, व या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा.सुशांत मस्के ग्रंथपाल यांनी भूषविले. प्रास्ताविक कु.खुशी यादव, सूत्रसंचालन कु. मोनाली बरबटकर व कु.नम्रता झाडे हिने आभार मानले. सायंकाळी 6.00 ते 8.30 या वेळात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून ग्रामस्थांना समाज प्रबोधनाचा संदेश दिला. रविवार दिनांक- 21-डिसेंबर-2025 ला सकाळी 6.00 ते 7.00 वेळात योग व प्राणायम करून दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी 9.00 ते 11.00 वेळात गावातील मुख्य रस्त्याची साफसफाई करून श्रमदान करण्यात आले. दुपारी 2.00 ते 3.00 या वेळात प्रथम बौद्धिक सत्राला सुरुवात झाली यामध्ये “राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्व विकास” या विषयावर मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रीकृष्ण बोढे, व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. विकास बेले यांनी भूषविले.सत्राचे प्रास्ताविक कु.धनश्री किनेकर, सूत्रसंचालन कु.प्रज्ञा सातारकर व कु.सुहानी पढाल हिने आभार मानले. द्वितीय बौद्धिक सत्र 3.30 ते 4.30 या वेळात आयोजित करण्यात आले. यात “विषमुक्त शेती व शेतीपूरक व्यवसाय” या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता श्री. मनोज गायधने (कृषी अधिकारी समुद्रपूर) व या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. नियोजुद्दीन सिद्दिकी शिक्षक संजय गांधी विद्यालय हिंगणघाट यांनी भूषविले.सत्राचे प्रास्ताविक कु.अनुष्का बुरडकर, सूत्रसंचालन कु.वैष्णवी श्रीनाथे व आभार कु.टिनू कानोडे हिने व्यक्त केले. सायंकाळी 6.00 ते 8.30 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून गावकऱ्यांचे समाज प्रबोधनपर मनोरंजन करण्यात आले. सोमवार दिनांक-22 डिसेंबर-2025 ला दिवसाची सुरुवात सकाळी 6.00 ते 7.00 या कालावधीत योग व प्राणायमाने झाली. त्यानंतर सकाळी 9.00 ते 11.00 या वेळात श्रमदान करण्यात आले.सोबतच “पशुधन समउपदेशन व लसीकरण शिबिर” पशुसंवर्धन विभाग हिंगणघाट यांच्यातर्फे राबविण्यात आले. ज्यामध्ये ग्राम (उमरी येडे) येथील पशुधनाची आरोग्य तपासणी व त्यावरील उपचार आणि लसीकरण शिबिर राबविण्यात आले. त्यानंतर प्रथम बौद्धिक सत्राची सुरुवात झाली. दुपारी-2.00 ते 3.00 या वेळात प्रथम बौद्धिक सत्रामध्ये “डिजिटल भारत” या विषयावर मार्गदर्शक म्हणून श्रीमती. श्रुती सोरटे (दुधलकर) तर अध्यक्षस्थानी प्रा. रवींद्र महाकाळे होते. सत्राचे प्रास्ताविक श्री. यश भेंडे, सूत्रसंचालन कु. निकिता मडावी व आभार कु.साक्षी कुडमेथे हिने मानले. द्वितीय बौद्धिक सत्र 3.00 ते 4.30 या कालावधीमध्ये संपन्न झाले यात “भारतीय संविधान व सामाजिक परिवर्तन” यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. अरविंद सोमनाथे, तसेच या बौद्धिक सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. विनोद पुनवटकर यांनी भूषविले. या सत्राचे प्रास्ताविक श्री.सौरभ सराटे सूत्रसंचालन कु. दिपाली बुरीले तर कु. आकांक्षा चिंचुलकर हिने आभार मानले. मंगळवार दिनांक-23 डिसेंबर-2025 सकाळी 7.00 ते 9.00 या कालावधीत श्रमदान करण्यात आले. त्यानंतर सकाळी-9.00 ते 12.00 या कालावधीत “आरोग्य समउपदेशन,रक्त तपासणी व रक्तदान शिबिर”डॉ.अजय लिडबे (मेडीकल मेडिकल कौन्सिलर) उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले.या शिबिरात शिबिरार्थी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्यानंतर बौद्धिक सत्राला सुरुवात झाली विशेष बौद्धिक सत्र दुपारी 12.00 ते 1.00 कालावधीत आयोजित करण्यात आले. यामध्ये”स्त्री भ्रूणहत्या एक समस्या”या विषयावर प्रमुख मार्गदर्शक डॉ.मनस्वी राजुरकर तसेच या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ.अजय लिडबे यांनी भूषविले. या सत्राचे प्रस्ताविक कु.राधा डफ, सूत्रसंचालन कु. पायल निकुरे तर आभार कु. निकिता मडावी हिने मानले. दुपारी 2.00 ते 3.00 या प्रथम बौद्धिक क्षेत्रामध्ये “पर्यावरण प्रदूषण व मानवी जीवन” या विषयावर मार्गदर्शक म्हणून डॉ. कमलाकर नवघरे व डॉ.जयंत शेंडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या सत्राचे प्रास्तावित कु. तृप्ती झाडे, सूत्रसंचालन कु. नेहा नांदुरकर तर आभार कु. रश्मी मालवीय हिने व्यक्त केले. द्वितीय बौद्धिक सत्र दुपारी 3. 30 ते 4.30 या वेळात संपन्न झाले या बौद्धिक सत्रात “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याकरिता मार्गदर्शक म्हणून कु. संगीता हेलोंडे (एपीआय) पोलीस स्टेशन हिंगणघाट व या सत्राचे अध्यक्ष स्थान डॉ. मिलिंद तेलंग यांनी भूषविले. या बौद्धिक सत्राचे प्रास्ताविक कु. मयुरी डोळसकर, सूत्रसंचालन कु. मनीषा कांबळे तर आभार कु.पल्लवी भुते हिने व्यक्त केले. बुधवार दिनांक 24- डिसेंबर-2025 सकाळी 11.00 समारोपीय कार्यक्रमाचे पार पडला. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा.प्रा.डॉ. उषाकिरण थुटे (अध्यक्ष ग्रामीण विकास संस्था) हिंगणघाट यांनी भूषविले. तर समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. बालाजी राजुरकर विशेष अतिथी डॉ.शरद विहीरकर(आयक्यूएसी समन्वयक) कार्यक्रम अधिकारी डॉ. कमलकिशोर इंगोले, प्रमुख उपस्थिती कु.सुरेखाताई उईके (उपसरपंच) मोहन येडे (शाळा समिती अध्यक्ष) श्री. सुशांत चौके (प्रभारी मुख्याध्यापक. श्री. प्रवीण फुलकर (ग्रामपंचायत सदस्य) रमेशरावजी दरंगे (समाजसेवक) उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कमलकिशोर इंगोले, (कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना) सूत्रसंचालन श्री.संकेत बांगडे तर समारोपीय कार्यक्रमाचे आभार डॉ. गजानन ठक व डॉ. श्रुती घरडे (सह- कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना) यांनी व्यक्त केले