
तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव तेल्हारा श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा श्रीमती पार्वती देवी तापडिया काॅन्हेट तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा शहरातून भव्य दिव्य दिंडीचे आयोजन उत्साहपूर्ण केले होते.
यावेळी शहरातील सर्व आजिव सदस्य उपस्थित होते यावेळी बाळासाहेब पाटील मार्के, रमेशभाऊ पाटील कोकाटे, साहेबराव सोनमाळे, अॅड विश्वासराव नेरकर, गजानन भाऊ पाटील, उद्धवराव विखे शाळा तपासणी अधिकारी,प्रा सुधाकरराव येवले, प्राचार्य डॉ गोपाल ढोले,व्ही . डी. गावंडे मुख्याध्यापक, सौ विद्या ताई देशमुख मुख्याध्यापिका, प्रा प्रशांत गेबड प्रा योगेश कोरपे धनंजय भंगाळे उत्सव प्रमुख सौ शर्वरी हिंगणकर मॅडम सुनील वंजारी शिक्षक प्रतिनिधी विजय दहे शिक्षकेतर कर्मचारी वर्ग प्रतिनिधी,उपस्थित होते सर्व मान्यवर मंडळी हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले आहे .एन सी सी पथक, लेझीम पथक, विविध प्रकारच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते.शहरात पालखीचे नागरीकांनी पुजन केले आहे सौ
कांचनताई विखे माजी नगराध्यक्ष, उद्धवराव विखे, सुधीर बापू देशमुख,सौ सुशिला ताई देशमुख,जितेंद्र देशमुख सौ मनिषा देशमुख अँड विश्वासराव नेरकर सौ माधुरी नेरकर प्रा उदय उपाख्य भैय्यासाहेब देशमुख, यांनी पालखीचे स्वागत केले आहे तसेच सुधीर बापू देशमुख, जितेंद्र देशमुख, अँड विश्वासराव नेरकर यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप केले आहे
विशेष म्हणजे दिंडी मध्ये उपस्थित सर्व आजिव सदस्य, शाळा तपासणी अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी यांनी लेझीम नृत्य व फुगडी नूत्य सादर केले आहे. भव्य दिव्य पालखीचे आयोजन चे सुञसंचालन शांतीकुमार सावरकर प्रा प्रशांत गेबड यांनी केले आहे सहभागी मंडळी चे आभार अंकेश भांबुरकर यांनी मानले आहेत
आकाश गवारगुरु रोहित वानखडे कु आरती तायडे कु प्रज्ञा गवारगुरू विद्यार्थी प्रतिनिधी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी शिव परिवार सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले आहेत
डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या नामोल्लेख ने शहरात उत्साह संचारला होता.