
अजय प्रभे :-
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी नगराध्यक्ष पदाकरिता भाजपचा विजय झाल्याने जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी जल्लोष करण्यात आला आहे
आमदार हरीश पिंपळे यांनी सर्वसाधारण कुटुंबातील हर्षल रामेश्वर साबळे या कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष बनविण्याचा संकल्प केला होता हरीश पिंपळे यांना या निवडणुकीला यश आले मुर्तीजापुर नगरपालिका मध्ये नगराध्यक्ष पदाकरिता हर्षल रामेश्वर साबळे हे विजयी झाले भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय लकडगंज या ठिकाणी मोठ्या उसाच्या वातावरणात कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला तसेच पेढे वाटप केले याआधी मुर्तीजापुर नगरपरिषदेवर भाजपचाही झेंडा होता यंदाही या निवडणुकीमध्ये भाजप आपले गरिमा कायम राखली या निवडणुकीमध्ये भाजपचे 11 नगरसेवक सुद्धा निवडून आले आहे त्यांचे सुद्धा स्वागत आमदार हरीश पिंपळे यांनी करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती कोमल तायडे यांनी दिली आहे