
तेल्हारा (जि. अकोला) : संपादक गुरुदेव ईसमोरे ••••तेल्हारा नगर परिषदेच्या 2025 मधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. एकूण 20 जागांच्या नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाने 13 जागा जिंकल्या असून वंचित बहुजन आघाडीला 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. उर्वरित 5 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याने शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी शहरात जल्लोष करत आनंद साजरा केला.
निकालानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी तेल्हारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तेल्हारा नगर पालीकेच्या एकुण 20 नगरसेवक पदासाठी निवडून आलेल्या नवनिर्वाचित उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे.प्रभात क्र. 1 अ मधुन सतिष रमेश जैसवाल 709. प्रभात क्र. 1ब मधुन कान्होपात्रा रामभाऊ फाटकर मते ५५१प्रभाग क्र. 2अ मधून अरुणा मंगेश ठाकरे 882 प्रभाग क्र. 2 ब मधुन विजयसिंह जयसिंह बोलोदे 587 प्रभाग क्र. 3अ गायत्री मंगेश सोळंके 732प्रभात क्र. 3ब मधुन जितेंद्र मुलचंद राठी 616प्रभाग क्र. 4अ मधुन प्रशांत शंकरराव विखे 617 प्रभात क्र. 4ब मधुन भक्ति दिपक छागाणी 712प्रभात क्र. 5अ मधुन साक्षी विठ्ठलराव वानखडे 623प्रभात क्र. 5ब मधुन अमित उमेश अग्रवाल 659प्रभाग क्र. 6अ मधुन संध्या विशाल गावत्रे 516प्रभात क्र. 6ब मधुन रुपेश गजानन चव्हाण 516 प्रभात क्र. 7अ मधुन रुपाली रामेश्वर हागे 445 प्रभात क्र. 7ब मधुन सचिन तुळशिराम तायडे 501 प्रभात क्र. 8अ मधुन जया विजय बघ्घन 479 प्रभात क्र. 8ब मधुन कैलास नारायण ठोकणे 682 प्रभात क्र 9अ मधुन प्रविण पंजाबराव ढोके 730 प्रभात क्र. 9ब मधुन पंचफुला पंचफुला कवर 716 प्रभाग क्र. 10अ मधुन राजेश रमेशराव खारोडे 508 प्रभात क्र. 10ब मधुन रिना मुकेश आसरे 305 मते घेऊन वरील उमेदवार विजयी झालेले आहेत