
सचिन महाजन :-हिंगणघाट प्रतिनिधी
हिंगणघाट येथील मातोश्री आशाताई कुणावर कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर व उपप्राचार्य डॉ. सपना जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला विभाग प्रमुख भाग्यश्री साबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गणेश इंगोले उपस्थित होते. प्रारंभी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा.भाग्यश्री साबळे यांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत स्वच्छता, समता व समाजसेवेचा संदेश आजच्या पिढीने आत्मसात करावा, असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे प्रा. गणेश इंगोले यांनी गाडगे महाराजांचे समाजप्रबोधनाचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. अनिल मानकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी फुटाणे यांनी प्रभावीपणे केले, कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन मीनाक्षी पावडे यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून संत गाडगे महाराजांच्या विचारांचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला