
बाळासाहेब नेरकर
धिरज बजाज हिवरखेड प्रतिनिधी :-
अधश्रद्धेने बरबटलेल्या समाजाला देव दगडात नाही देव अंपग, रोगी, निराश्रीतांच्या सेवेत शोधा, त्यांची भूक तहान दवा कपडा लत्ता देऊन त्यांना मदतीचा हात द्या, तो परमात्मारुपी आत्मा तुम्हाला तुमच्या लेकरा बापड्याना नक्कीच आशीर्वाद देईल.
असे गावोगावी किर्तनातुन लोकाना खरे ज्ञान देनारे संत म्हणजे गाडगेबाबा होते.
त्यांचा जन्म एका परिटा च्या घरी म्हणजे बाप झिंगराजी जानोरकर व आई सखूबाईच्या पोटी 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. त्यांचे नाव डेबुजी… डेबुला शाळेत दाखल केले पण गरीबीचे चटके सहन करनारे कूंटुबाची गत काय असते डेबुजीले लहानपनात वडीलाची छञछाया हरवल्यावर माहीत पडले. त्यांची आई सोबत मामाच्या गावाला घेऊन गेली तीथे गुरे ढोरे चारण्यासाठी डेबुजी जाऊ लागले कुंताबाईशी वैवाहीक जिवन जगताना मामाची शेती मुर्तिजापुर च्या सावकारा कडे गहान होती ती सोडवण्यासाठी सावकाराशी त्या काळी भांडण केले. संसाराचा गाडा हाकताना कूठे तरी समाजात बदल व्हावा म्हनून बाबांनी घरा दाराचा मोह सोडुन वयाच्या 29 व्या वर्षी सर्व भारत भुमीतील समाजाला आपले समजून जीथे जात ते गाव स्वच्छ करत अंगी थीगळ असलेला स्वच्छ धूतलेला सदरा व पंचा नेसलेले व हातात खराटा हा पेहराव असलेले बाबा तहान लागली तिथे मातीचे अर्धवट फूटलेले खापर म्हनजे अर्धे गाडगे त्यामधे लोकाना पिण्यास पानी मागने असे पेहरावा मूळे लोक गाडगे बाबा म्हनून हाका मारत. बाबा फुकट कूठेच खात नसत कूर्हाड मागून कूनाचे बंडीभर इंधन फोडून देत. नाली काढने, आंगण झाडुन देत, आणी आन वो माय भाकर भाजी दे तुये सांगेल काम केले व्हय.. ती भाकर आनायले घरा मधे गेली की बाबा तिथुन पसार होत दुसर्या गावात जात तीथे ही गाव स्वच्छतेसाठी लोकांना जमा करत, जेवनात हातावर भाकर भाजी घेऊन झाडाखाली बसुन खात. व गाडग्यात पाणी मागून पीत असे दिवसा ते पुर्ण गाव खर्याट्याने झाडून स्वच्छ करत व संध्याकाळी देवळा समोर पाराजवळ गोट्याचे टाळ करून गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला चा गजर करत. लोकांना कीर्तनासाठी जमा करत. आपल्या विदर्भाच्या मातीचा बुलंद कनखर आवाजात लोकाना अज्ञानरुपी अंधकारातुन बाहेर निघण्याचा मार्ग दाखवत.
अरे बापहो लेकराइले शाळा शिकवा, मायबापाची सेवा करा दारू मटन खाउन संसार खराब करु नका, ईन ईवायाले पाहुनचार साधा करा मूक्या प्राण्यावर दया करा. कोंबडे बकरे च्या नवसाने देव पावत नाई. देव त्याचे रगत मासाने कधीच परसन्न होत नाई, नवसाने कूनाले पोर होत असते तर लगीन कराची जरुरत नसती बाबा,
कीर्तन करताना त्यांनी बाबासाहेबासारखे शिक्षण घ्या बॅरीस्टर, मास्तर, साहेब व्हा लेकरांना शिकवा, अगांत फाटक शिवेल थिगळ लावलेले घाला, लेकीले पोराले शाळेत पाठवा,
जो संत स्वता कीर्तन करत असताना मुलगा मेल्याचे निरोपा वरुन कीर्तनात सागंतो कोट्यानी कोटी लोक मेले मी का लढू एका साठी?
तिर्थात देव नाही.. “पत्थर को देव बनाया तीरथ बनाया पाणी।।
दुनिया भाई दिवानी सब पैसो की धूलदाणी।।”
असा स्वता अशीक्षित असलेला संत समाज परीवर्तनाचे धडे सगळ्या समाजाला देत कुनाला पाया पडू देत नसत. कुनी पाया पडायले लागला तर खर्हाट्याची मूठ पाठीवर मारत. परीवाराला सुद्धा स्वकष्टाची मजुरीचे मोल काय असते हे शिकवून पत्नी कूंताबाईच्या सहवासाने संत तुकोबाचे अभंग तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अवतार मेहेर बाबा, बाबासाहेब आंबेडकर या सर्वासोबत बाबाचा सहवास लाभला. समाज सूधारण्यासाठी आपला खराटा चालवत असत. काशी तिर्थस्थानी श्राद्ध प्रसंगी मंञोपचाराने अन्न स्वर्गीय आत्मसतुष्टी होते तर या मंञोपचाराने माया वावरातही पाणी जायाले पाहीजे असे आत्मसतुष्ठी श्राधाला भोज पुजा प्रंसगी पोरोहीतास उद्देशून समाजाचे मनातील अंधश्रदा दूर करताना दिसनारे संत म्हणजे गाडगेबाबा होते.
त्यानी पंढरपुरातही चद्रभागेतीरी किर्तनातुन लोकाना ऊदाहरण देत दगडाचा देव नैवेद्य खात नाही. खात असलेला नैवेद्य त्या श्र्वानाला सूद्दा हानत नाही.
खरा देव रोगी महारोगी अपंग निराधार यांच्यातच आहे त्यांना जेवू घाला कपडा लत्ता दवा पानी करा, गरीबाच्या पोरीच्या लग्णाला मदत करा, हूंडा देऊ नका, घेऊ नका, दारु मटनापासून दुर रहा, संसाराचा धिंगाना करु नका, गुरा ढोरावर प्रेम करा, ईनईवायास पाहूनचार साधा करा असे समाज सूधारक व स्वता अडानी असलेल्या बाबाचे नावाने शासनाने स्वच्छता अभीयान राबवीले होते या शासनाने पुन्यतीथीला शासकीय कार्यालयात राबवावे त्या महात्म्याला आदरांजली वाहावी तसेच आदरनीय मोदीजीच्या नेतृत्वात सरकारने भारतरत्न देऊन गौरव करावा
महाराष्ट शासनाने सूद्दा गॅझेट मधे गाडगेबाबा पुन्यतीथी चा ऊल्लेख करत कार्यालयीन कामकाज प्रसंगी संतपुजन आदरांजली घ्यावी, असे तमाम समाज बाधंवा कडुन मागणी होते. त्यांचे नावाने भारत देशात असलेल्या शैक्षणीक संस्था, दवाखाने, धर्मशाळा, मंदीरे, हे त्याच्या कार्याची पावती असून त्यांनी त्यांच्या समाजाला, नातेवाईकाला, गणगोताला संस्था, धर्मशाळा, मधे ट्रस्टी होऊ दिले नाही. व देनगी यामधे बाबानी गणगोताला भागीदार होऊ दिले नाही. स्वकष्टाने पोट भरुन ऊदर निर्वाह करण्याचा मंञ देनारे, गोपाला गोपाला देवकी नदंन गोपाला, चा गजरातुन आपल्या कनखर वानीने जनमानसात सवांद साधत किर्तनातुन सर्व दुरदृष्टी ठेवनारे संत म्हणजे गाडगे बाबा होते. संत गाडगेबाबानी 20/12/1956 ला या जगाचा नीरोप घेतला.
भारत सरकारने संत गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नेरकर यांनी केली आहे.