
मनोहर गोलाईत :-खडाळा प्रतिनिधी :-
खंडाळा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावात वन्य प्राण्यांचा वावर ही नित्याचीच बाब झाली आहे परंतु आतातर चक्क डांबररोडवर बिबट्याचा ठिय्या दिसून आल्याने नागरिकात भिती चे वातावरण निर्माण झाले आहे
3 एप्रिल रोजी रात्री आठ ते साडेआठ दरम्यान धोंडाआगर येथील माजी सरपंच दिनेश मावसे हे आपले शेतात जात पिकांना पाणी देण्यासाठी असताना घरा पासून थोड्याच अंतरावर धोंडाआखर चीपी दरम्यान असलेल्या डांबर रोडवर बिबट्या ठाण मांडून बसलेला दिसताच त्यांची तारांबळ उडाली त्यांचे सोबत असलेल्या सहकार्याला सावध करुन बिबट्या फोटो मोठ्या हिमतीने काढला असता त्याला चाहूल लागताच त्याने उठून चालत असतानाचा व्हिडिओ सुध्दा शुट करण्याची हिम्मत केली
अगोदरच महाराष्ट्रात बिबट्याने अनेक भागात गावात शिरुन लहान बालकांना उचलुन नेले तर अनेकांना जखमी केल्याच्या बातम्या टिव्ही वर्तमान पत्रातून झळकत आहेत तर आदिवासी भागात तर अनेकांचे घरे कुडामातीचे असुन कित्येकांच्या घराला धड दरवाजे पण नसल्याने चीत्र आहे त्यात एकदमच गावाजवळ बिबट्याचे ठाण मांडून बसणे या मुळे गावात त्या बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे तसेच चीचारी ते चीपी हा डांबरीकरण चा रस्ता सातपुड्याच्या पायथ्या पासुन जात असल्याने या रस्त्यावर चीचारी चंदनपुर तलई बोरव्हा भिली धोंडाआगर गायराण चीपी इत्यादी गावे असुन या रस्त्याने विद्यार्थी शेतकरी मजुर शासकीय कर्मचारी यांना नेहमीच जा ये करावी लागते तरी संबंधित वन अधिकारी यांनी या भागात वन्यप्राण्यांच्या कायमचा बंदोबस्त करावा असी मागणी जोर धरत आहे