
तेल्हारा, तालुका ,प्रतिनिधी: नंदकिशोर नागपुरे
सालाबाद प्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर दानापुर येथे ग्रामदैवत आणि कुलदैवता च्या उत्सवा निमित्त शेकडो वर्षांची ‘दावण’ ओढण्याची परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली. श्रद्धेचा आणि साहसाचा अजोड संगम असलेल्या या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम
या परंपरेचे मुख्य आकर्षण म्हणजे एकामागे एक बांधलेल्या पाच बैल गाड्या. काही भक्तांनी मरि आई च्या मंदिरा पासून तर काही भक्तांनी आपल्या निवासस्थाना पासून ही दावण ओढली. यातील वैशिष्ट्य असे की, पहिल्या बैलगाडीमध्ये सुवासिनी स्त्रिया बसतात, तर मागील गाड्यांमध्ये लहान मुलांना बसवले जाते. ही दावण ओढून भाविक आपला जुना नवस पूर्ण करतात.
भक्तीचा जनसागर आणि महाप्रसाद
आजच्या धावपळीच्या युगातही ही प्राचीन शेकडो वर्षाची परंपरा गावाने मनोभावे जपली आहे. दावण ओढण्याच्या या थरारक आणि भक्तिमय सोहळ्यानंतर संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण होते.
दावण सोहळा: पाच गाड्यांची साखळी ओढून नवस पूर्ती.
सहभाग: गावातील सुवासिनी आणि बालकांचा उत्साही सहभाग.
महाप्रसाद: विधी पूर्ण झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमामुळे गावातील धार्मिक वातावरण अधिकच चैतन्यमय झाले असून, ग्रामस्थांनी हा उत्सव शांततेत आणि भक्तिभावाने साजरा केला.