
उमरा प्रतीनिधी:- रामेश्वर कावरे
उमरा सर्कल परिसरात यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाचे पीक समाधान कारक झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा हवामान अनुकूल राहिले, तसेच योग्य वेळी झालेल्या पावसामुळे आणि थंडीच्या चांगल्या कालावधीमुळे गव्हाच्या वाढीस पोषक वातावरण मिळाले. परिणामी गव्हाच्या उंबीची वाढ चांगली होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी सुधारित वाणांचा अवलंब करत आधुनिक शेती पद्धतींचा वापर केला. वेळेवर पेरणी, संतुलित खत व्यवस्थापन, ठिबक व तुषार सिंचनाचा वापर, तसेच पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर केलेली योग्य निगा यामुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही वाढले आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव यंदा तुलनेने कमी राहिला. वेळोवेळी दिलेल्या सूचना, शेतभेटी आणि जनजागृतीमुळे शेतकऱ्यांना योग्य उपाययोजना करता आल्या. त्यामुळे गव्हाचे पीक निरोगी राहून कणसे भरघोस लागली आहेत.
सध्या कापणीचा हंगाम सुरू होत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही ठिकाणी कापणी पूर्ण झाली असून उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक मिळाल्याचे दिसून येत आहे. बाजारात गव्हाला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.पण दर मात्र कमी आहे.
एकंदरीत, उमरा सर्कलमध्ये यंदाचा गहू हंगाम शेतकऱ्यांसाठी हा हंगाम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे..