
तेल्हारा प्रतिनिधी :-
तेल्हारा तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्यरत आहेत विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा मध्ये प्राविण्य प्राप्त करून यशस्वी होतात. या मध्ये शाळेतील माजी विद्यार्थी सुरज ठाकूर यांने स्पर्धा परीक्षा मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे घरची परिस्थिती हलाखीची असुन अभ्यास केला आहे. त्यांची मोठी बहीण सौ पूजा विशाल नांदोकार ( ठाकूर ) हिने पण यश संपादन केले आहे विशाल नांदोकार समाज सेवक आहेत ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करतात श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे शालेय शिक्षण मध्ये एन सी सी, विविध क्रिडा स्पर्धा विविध शाळा स्तरावर स्पर्धा परीक्षा आयोजित करून सहभागी केले जाते. या उपक्रमाचे फळ विद्यार्थी भविष्यात ही स्पर्धा परीक्षांमध्ये संपादन करतात त्यामुळेच आज तालुक्यातील बहुतांशी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊन उच्च पदावर नोकरी करत आहेत तळघळातील बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. सुरज ठाकूर यांचे अभिनंदन सुरेशदादा खोटरे साहेब कार्यकारिणी सदस्य,सर्व आजिव सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती शाळा समिती शाळा सदस्य व शातीकुमार सावरकर प्रभारी मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी यांनी केले आहे.