
अकोट तालुका प्रतिनिधी :प्रभाकर बोरकर
देवरी गावकऱ्यांचे श्रद्धास्थान श्री पंचमुखी महादेव विदर्भातून एक अग्रगण्य देवालय म्हणून सुप्रसिद्ध असलेले श्री पंचमुखी महादेव यांची यात्रा 23 मार्च ते 31 मार्चपर्यंत संपन्न होणार आहे.
सालाबाद प्रमाणे संपन्न होणारी नवसाची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे
मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण व प्राचीन जागृत शिवलिंग असून अख्ख्या महाराष्ट्रामधून भाविक भक्त बारसला हजेरी लावतात गावकऱ्यांच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दि. 23 मार्च ते 29 मार्च पर्यंत दररोज दुपारी एक ते पाच पर्यंत कथावाचक वेधशास्त्र संपन्न ह भ प श्री सुरेश जोशी महाराज यांच्या अमृततुल्यवाणी मधून भागवत श्रवणाचा भक्त लाभ घेत आहेत .
त्याचप्रमाणे ब्रह्मनिष्ठ ह भ प श्री श्रीकांत महाराज जोशी (सोनू महाराज) देवरीकर यांच्या अमृततुल्यवाणी मधून संगीतमय कथा संपन्न होत आहेत. महादेवाच्या लग्नाचा कार्यक्रम लोटांगण मंदिर परिक्रमा मुख्य यात्रा मितीचैत्र शुद्ध बारस सोमवार दिनांक 30 मार्च रोजी आयोजित केलेली आहे .
मुख्य यात्रा महोत्सवाच्या दिवशी रात्री आठ वाजता भारुड सम्राट ह भ प श्री संतोष महाराज भालेराव शेलु बाजार यांचा बहुरंगी भारुडाचा कार्यक्रम भारुड प्रेमींसाठी आजच्या चालू परिस्थितीवर आयोजित केला आहे.
31 मार्च रोजी यात्रेची दहीहांडी करिता मंगळवारला अकरा वाजल्यापासून ढोलाची मिरवणूक ढोल भजनी प्रेमींकरता आयोजित केली आहे.
बाहेर गावावरून येणाऱ्या व पंच कमिटीने ठरविलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करणाऱ्या सहभागी प्रत्येक भजनी मंडळास शिवभक्त दान दात्यांकडून आलेल्या निधीमधून मानधनरूपी 2100 रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल
तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी प्रत्येक भजन मंडळास नियमाचे पालन करणे बंधनकारक असेल प्रत्येक भजनी मंडळास शेवटपर्यंत 14 व्यक्ती हजर असणार चार ढोल व दोन बासरी वादक आवश्यक आहेत प्रत्येक भजन मंडळाचा गणवेश असणे अनिवार्य आहे.
पंचमुखी महादेवाची मिरवणूक देवरी गावातुन निघत असताना वेळेवर अकरा वाजताच मिरवणुकीला सुरुवात करण्यात येईल सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळांनी पंचमुखी महादेव विश्वस्त मंडळांनी दिलेल्या नियमाचे व अटी शर्तीचे तंतोतंत पालन करावे
त्याचप्रमाणे गावकऱ्यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा महोत्सव दहीहांडा पोलीस स्टेशनच्या सहकार्याने संपन्न होतो. तरी शिवभक्तांनी यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महादेव संस्थान ट्रस्ट व समस्त गावकरी मंडळींनी केले आहे.