
तेल्हारा तालुका प्रतिनिधी..नंदकिशोर नागपुरे
दानापुर येथील श्री संत रुपलाल महाराज मंदिर दानापूर व साध्वी कालंका माता मंदिर दानापूर येथे दिनांक २३ मार्च सोमवार रोजी महाराजाची पुण्यतिथी साजरी करण्यात आली रुपलाल महाराज मंदिर येथे आदल्या दिवशी तिर्थस्थापन करून दुसऱ्या दिवशी पाहाटे मुर्तीला जलाभिषेक करून पुजन करण्यात आले व दुपारी एक वाजता काला व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला सायंकाळी सहा वाजता महाराजांच्या चरण पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली तर साध्वी कालंका माता मंदिर येथे शिवमहापूराण कथेमध्ये कर्मयोगी श्री संत रुपलाल महाराज व परमहंस पुंडलिक बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कथा प्रवक्ते हभप श्री गजानन महाराज दहीकर यांचे हस्ते रुपलाल महाराजांच्या व परमहंस पुंडलिक बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून हरिनाम गजर करण्यात आला या वेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष तरुण युवक युवती भाविक उपस्थित होते