
नंदकिशोर नागपुरे:- तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे दी. 24 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवा व्याख्याते समाज परिवर्तनकार तथा राष्ट्रभूषण भारतीय नवजवान व छत्रपती पुरस्कार विजेते प्रा वसंत हंकारे यांच्या जाहीर व्याख्यान कार्यक्रम दानापूर गावकरी मंडळी व पोलिस स्टेशन हिवरखेड यांच्यातर्फे संयुक्त विद्यामाने येथील हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्याख्याते प्रा वसंत हंकारे हे आई बाप समजून घेताना या विषयावर विद्यार्थी, विद्यार्थिनी, व महिला वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत .
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपली नाती जपण्यासाठी स्वतःला आणि आपल्या माणसांना ओळखण्यासाठी, आजच्या धावपळीच्या युगात आपण भौतिक प्रगती तर केली पण रक्ताच्या नात्यांमधील संवाद हरवत चालला आहे का? या महत्वाच्या विषयांवर मंथन करण्यासाठी त्याचं बरोबर आई _ वडील आणि मूल यांच्यातील दुरावत चाललेला संवाद, बदलत्या काळातील पालकत्वाची आव्हाने समजून घेण्यासाठी , तरुणांना आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव करून देण्यासाठी आणि घरातील वातावरणात आनंदी आणि संस्कार श्रम बनवण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी पंचक्रोशीतील सर्व विध्यार्थी, विद्यार्थिनी , महिला व नागरिकांनी या व्याख्यानाला उपस्थित रहावे असे आवाहन दानापूर गावकरी व पोलिस स्टेशन हिवरखेड यांनी केले आहे.