
प्रभाकर बोरकर :-
चौहटा बाजार प्रतिनिधी
चौहटा बाजार परिसरामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असणार तीर्थक्षेत्र म्हणून बऱ्याचवर्षापासून मोठ्या भक्ती भावाने आसरा देवीचा नवरात्र उत्सव श्रीमती आशाताई वावरे व त्यांचा परिवार हे गुढीपाडव्यापासून प्रारंभ साजरा करतात नवरात्रोत्सवाचे उपवास हनुमान जयंती पर्यंत ठेवतात. त्याचप्रमाणे आसरा देवीच्या मंदिरामध्ये अनेक भाविक भक्तगण दर्शनाला हजेरी लावतात.देवीची महती ही फार काही वेगळ्या स्वरूपाची आहे. सात घोरपड यांच्या रूपामध्ये येऊन त्यांना स्थानापन्नकेलेले आहे. व त्याबाबतचे दास फुले महाराज विदर्भ व्यास म्हणून 2001 एक आसरा देवीचा अध्याय सुद्धा प्रसिद्ध केला आहे त्या अध्यायामध्ये आसरा देवीची पूर्णतः कहानी विशद केली आहे. चौहटा बाजारयेथे स्थानापंन्न झाल्यानंतर अनेक भाविक भक्तांचे रक्षण करून अनेक भक्तांना सद्बुद्धीपूर्वक मार्ग दाखविला .2001 पासून आश्रमाता देवीच्या स्थापना होऊन अनेक भाविक भक्तांना खूप मोठ्या प्रमाणात चमत्कार झालेत या बाबत परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यामुळे अनेक भाविक भक्तांचे आज रोजी आसरा माता संस्थान हे श्रद्धास्थान बनले आहे. त्यामुळे हाकेला धावणारी आसरा माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. त्यामुळे विविध भक्त नवस फेडण्याची प्रथा जोपासतात आजपर्यंत संस्थांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संस्थांच्या वतीने पार पाडण्यात येतात तसेच या धार्मिक स्थळाला अनेक लोकप्रतिनिधी प्रामुख्याने हजेरी लावतात गुढीपाडव्याला घटस्थापना होऊन धार्मिक कार्यक्रमांना आसरा देवी संस्थान मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. अनेक भाविक भक्तांना या महत्त्वपूर्ण सामाजिक विविध कार्यामध्ये सहभाग नोंदवितात. त्यामुळे आसरा देवी संस्थान हे सर्वांच्या परिचयाचे आहे. प्रारंभ झालेल्या घटस्थापनेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.