
विनोद सगणे
सिरसोली प्रतिनिधी :-
दिनांक 17 मार्च 2026 ग्राम सिरसोली येथे जयंती महोत्सवाच्या नियोजना संदर्भात लेझीम व आखाड्याची उद्घाटन करण्यात आले यादरम्यान कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व धम्म ध्वजाच्या पूजनाने सुरुवात करण्यात आली, लेझीम पथकाचे प्रशिक्षक म्हणून आडगाव येथील भीमशक्ती लेझीम पथक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , संपूर्ण लेझीम तथा साहित्य जुळवणीकरिता सौ कल्पनाताई बजरंग इंगळे यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले, पहिल्या दिनी उद्घाटनाप्रसंगी बहुसंख्य महिला युवक तथा मुलांची मोठ्या संख्येने उपस्थितत सदर कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजक फुले शाहू आंबेडकर विचारधारा मंडळ आणि सुमंगल सेवा संघ यांच्या वतीने करण्यात आला.