
तेल्हारा ता. प्रतिनिधी: नंदकिशोर नागपुरे
तेल्हारा तालुक्यातील खारसा येथील ऋषी महाराज संस्थान येथे नुकतेच भव्य ‘शेतकरी चर्चासत्र’ उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध पिकांवरील रोगराई आणि आधुनिक व शाश्वत शेती तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचा प्रारंभ संत रूपाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा दुपट्टा आणि नारळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.सूत्र संचालन श्री. श्रीकांत ठाकरे यांनी केले
यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. निलेश गावडे सर तसेच श्री.राजू काळे यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.तसेच शेतकऱ्यांच्या शंकाचे निरासन केले, प्रामुख्याने मिरची, कापूस, केळी, पपई, अद्रक, संत्रा आणि पानपिपरी यांसारख्या विविध पिकांवर पडणारी कीड व रोगांचे नियंत्रण कसे करावे, यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
चर्चासत्रादरम्यान शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री.गावडे सरांनी समाधानकारक उत्तरे दिली, ज्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे पूर्णपणे निरसन झाले.
मान्यवरांची उपस्थिती या चर्चासत्राला खालील मान्यवर आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते:
श्री निलेश गावडे
श्री. श्रीकांत ठाकरे
(क्षेत्रीय व्यवस्थापक ग्रो इंडिगो प्रा.ली.)
श्री.अक्षय मोरखडे
श्री.राजूभाऊ काळे (लक्ष्मी ॲग्रो मार्ट)
श्री. विनोद मातोडे
(रुची कृषी केंद्र, हिवरखेड)
योगेश येऊल
(योगीराज कृषी केंद्र, दानापूर)
अनिल फोपसे
(माऊली कृषी केंद्र, हिवरखेड)
सांगता दुपारी १२ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होता. मार्गदर्शनानंतर उपस्थित सर्व शेतकरी बांधवांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हे चर्चासत्र संपन्न झाले.