
नंदकिशोर नागपुरे :- तेल्हारा तालुका प्रतिनिधी
साध्वी कालंका माता मंदिर येथील कालंकामाता सभागृह येथे साध्वी कालंका माता जन्मोत्सव निमित्त गेल्या दोन वर्षांपासून साध्वी कालंका माता भक्त मंडळ व गावकरी यांच्या वतीने संगीतमय शिवमहापूराण कथा आयोजन करण्यात येते. ह्या वर्षी दिनांक १९ मार्च गुढीपाडवा ला संगीतमय शिवमहापूराण कथा प्रारंभ होणार असुन कथा प्रवक्ते श्री हभप निलेशजी महाराज भूंबरे, श्री विठ्ठलेश आश्रम आसलगाव. यांच्या अमृततुल्य वाणीतुन कथा श्रवणाचा लाभ मिळेल . प्रथम दिनी ब्रम्हमृतावर मुर्तीला जलाभिषेक, गुढी उभारून नवीन वर्षांचे गाठीवाटप करून स्वागत, व दुपारी एक वाजता शिवमहापूराण कथा प्रारंभ होईल दररोज सकाळी काकडा दुपारी एक ते पाच शिवमहापूराण कथा संध्याकाळी हरिपाठ ,दिनांक २५ मार्च ला सायंकाळी सहा वाजता होम हवन,२६ मार्च २०२६ ला सकाळी ११ वाजता हभप श्री निलेशजी महाराज भूंबरे यांचे काल्याचे किर्तन व दुपारी १२ वाजता प्रभू श्रीराम, साध्वी कालंका माता व परमहंस रामचंद्र महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. दुपारी एक ते पाच महाप्रसाद व सायंकाळी पाच वाजता सांप्रदायिक महिला मंडळ वरवट बकाल,व दानापूर भजनी मंडळाच्या हरिनाम गजरात शिवमहापूराण कथा, साध्वी कालंका माता चरण पादुका, पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .