
सतोष विनके :-अकोट प्रतिनिधी
अकोट : अकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत स्व.रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार दिनांक १२ मार्च २०२६ रोजी संत श्री.गजानन महाराज मंदिर परिसर,गजानन नगर,अकोट येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अकोट शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते,मित्र परिवार तसेच शहरातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व.रामाभाऊ कराळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी स्व.कराळे यांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याला उजाळा दिला.
यावेळी वक्त्यांनी आपल्या मनोगतातून स्व.रामाभाऊ कराळे यांनी कार्यकर्ता,शिवसेना जिल्हाप्रमुख ते आमदार म्हणून कार्य करताना अकोट विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कामांची आठवण करून दिली.
जनतेशी असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध,साधेपणा, कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी आणि समाजहितासाठी केलेले अथक प्रयत्न यांचा विशेष उल्लेख याप्रसंगी करण्यात आला.रामाभाऊंच्या कार्यकाळात अकोट विधानसभा मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लागली असून त्यांच्या कार्यातून अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली असल्याचे अनेक वक्त्यांनी प्रतिपादन केले.
तसेच दिवंगत स्व.रामाभाऊ कराळे यांच्यासोबत दीर्घकाळ काम केलेल्या सहकाऱ्यांनी यावेळी आपले अनुभव व्यक्त करत त्यांच्या संघटन कौशल्याबाबत आणि कार्यपद्धतीबाबत विशेष प्रकाश टाकला.अत्यंत कठीण आणि गरिबीच्या काळात सोबत असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्याची क्षमता,संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी केलेले त्याकाळी प्रयत्न आणि प्रत्येक कार्यकर्त्याशी जपलेला स्नेह यामुळे ते सर्वांच्या मनात कायम स्मरणात राहतील,असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या अभिवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांनी स्व.रामाभाऊ कराळे यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.कार्यक्रमात विविध मान्यवरांनी दोन शब्द मनोगत व्यक्त करत त्यांच्या कार्य व स्मृतींना शब्दरूपी उजाळा देत अभिवादन अर्पण केले.
सदर कार्यक्रमात उपस्थित असणारे सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी,सहकारी तसेच नागरीक खालीलप्रमाणे…कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संजय गावंडे,नगराध्यक्षा मायाताई धुळे,उपनगराध्यक्ष प्रथमेश बोरोडे,राजू भाऊ नागमते,पुरुषोत्तम चोखंडे,दिलीप बोचे,कुलदीप वसू,जगन निचड,अतुल म्हैसने,डॉ.गजानन महल्ले,सुरेश कराळे,राजू भालतीलक,ज्ञानेश्वर मानकर,राजू रावनकार,गोपाल मोहोड,हरीश टावरी,पप्पू डाबेराव,अविनाश गावंडे,दिलीप मिसळे,शेंडे काका,डॉ.दिनेश नागमते,विजय कुलट,मनोज चंदन,विजू ढेपे,प्रशांत जवंजाळ,बिहाडे मामा,अनंत कोकाटे,संजय पालखडे,विजय चंदन,राजू ढोले,सुरेश काटोले,शिवा टेंबझरे,विवेक धुळे,बंडू शिरसाट,राहूल कराळे,निलेश चंदन,अप्पू बोरकर,बजरंग मिसळे,पद्माकर रेळे,अनिकेत पोतले,धीरज गीते,श्रीकांत साबळे,रवींद्र सोळंके,फड सर,गोपाल भगत,अजय भांबुरकर,सुशील लोणकर,सागर कराळे,प्रफुल माकोडे,भूषण लिल्लारे,रोशन हिरुळकर,गोपाल सावके,चंद्रकांत वासनकार,गणेश नागरे,ऋषभ कुचेकर,नीरज बोरोडे,गौरव माकोडे,प्रसन्न जवंजाळ,शुभम गावंडे,विशाल दाभाडे,शुभम परियाल,विशाल कोडापे,मनीष कराळे,श्रीजित कराळे,विजय बेदरकर यांचे सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम अत्यंत शांत आणि भावनिक वातावरणात पार पडला.उपस्थितांनी दिवंगत स्व.रामाभाऊ कराळे यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजकार्यात सक्रिय राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी अकोट शहरातील सर्व पक्षीय नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते,मित्र परिवार तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.