
प्रभुदास पारस्कार :- संग्रामपुर तालुका प्रतिनिधी
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस ठाण्यात मोबाईल सोशल मीडियाद्वारे छळ प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला सोनाळा पोलिसांनी पुणे शहरातील भोसरी येथुन अटक करण्यात आली,
मा.जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश तांबे , मा.अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनान्वय सोनाळा पोस्टे ठाणेदार संदीप काळे यांनी वायुवेगाने तपास सुरू केला .तपास पथक गठीत करून पोउपनि महादेव खोने, पोकॉ राहुल पवार, संजय सास्ते यांनी तांत्रिक विश्लेषण व कौशल्याच्या बळावर तपासाच्या आधारे अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक केली. पुणे शहरातील भोसरी परिसरात गर्दीच्या ठिकाणी लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या या प्रकरणात आरोपी ऋषिकेश श्यामगीर गिरी वय 27 राहणार सोनाळा ता. संग्रामपूर याला अटक करून सोनाळा पोस्टेला आणून न्यायालयात हजर केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींने पीडित महिलेचा सोशल मीडिया माध्यमाद्वारे सतत पाठलाग करून तिचा विनयभंग केला. तसेच पीडितेचे खाजगी फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिला धमकावत फोनवर बोलण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनेप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 67/2026 कलम 75 (1),75 (2), 77 , 78, 352, 351(2), 351(3) , 356(2) कलमान्वये नुसार भारतीय न्याय संहिता 2023 सहकलम 66 (ई) , 67 , 67 (अ) माहिती तंत्रज्ञान अधि 2000 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप काळे यांनी तातडीने तपास पथक गठीत करून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने, पोलीस कर्मचारी राहुल पवार व संजय सास्ते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत पुण्यातील भोसरी येथे सापळा रचून त्याला अटक केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे करीत असून न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.