
अंजनगाव सुर्जी ता.प्र.अनंता मते
अंजनगाव सुर्जी तालूक्यातील खिराळा येथे दि.७ ते ९ तारखेपर्यंत आयोजीत सातपुडा शंकरपटात क गटातून पवन आणि शिव या जोडीने पटकावला असुन गावगाडा गटामध्ये साधु आणि शंभु या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावत निमखेड – खिराळा पंचक्रोशीतील नागरीकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
शंकरपटाचे मुख्य आयोजक विजयपाटील तिजारे यांनी तिन वर्षापुर्वी सुरु केलेल्या सातपुडा शंकरपटाला आता भव्य स्वरुप प्राप्त झाले आहे.या शंकरपटाकरिता परिसरातील, निमखेड बाजार,हिररापुर,खीराळा,चौसाळा,चिंचोणा,लखाड या गावातील नागरिक हिरीरिने सहभागी होतात.तर शंकरपटाकरीता संपुर्ण विदर्भासह मराठवाड्यातूनही बैलजोड्या येत असल्या ने या शंकरपटाचे महत्व अधोरेखीत होते. अंजनगाव सुर्जी नगरपालीके चे नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांचे हस्ते स्पर्धक जोडी मालकांना बक्षिस वितरण झाले.या वेळी विचारपीठावर विजपाटील तिजारे मुख्य आयोजक, विनोद पाटील टेकाडे माजी पस.सभापती,अजय पसारी,विठ्ठल सावळे,अविनाश ढेंगे , नारायण काळमेघ उपस्थित होते.२ लक्ष ८५ हजार ३११ रुपयाच्या ३४ बक्षिसांची लयलूट या पटात झाली असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक.किशोर पवार,संजय ताठे,विनोद टेकाडे,नंदू खडसे,डॉ गजानन टेकाडे,किशोर शेळके,छोटू अढाऊ,रवि भगत,संदीप ठाकरे,सुरेश ठाकरे,सुभाष ताठे,महेश ताठे,प्रियेश पवार,अमोल तिजारे,सुरज भिसे,अनंत मते,शंकर इंगळे,नितीन घनमोडे,सुजीत काठोडे,शुभम निमकाळे यांनी प्रयत्न केले तर घड्याळीची जबाबदारी राजुभाऊ मंदाळे यांनी सांभाळली.