
तेल्हारा प्रतिनिधी :-
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आयोजित कूषी अभ्यास दौरा मेळावा ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे संपन्न झाला आहे यावेळी अमरावती येथील शेतकऱ्यांनी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यासाठी शेतीत भेट दिली आहे
भारत हा नुसता कृषी प्रधान नसून , तो अनाधिकालापासून ऋषी आणि कृषीप्रधान देश आहे. परंतु मुघल आणि इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जुलमी कालखंडामध्ये ऋषी परंपरेचा ऱ्हास झाला परिणामी एकेकाळी विश्वगुरू असणाऱ्या देशाला प्रत्येक गोष्टी करीता इतरांवर अवलंबून राहावे लागत होते. तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणारा कृषी सुद्धा राजकीय ध्येयधोरणांमुळे पूर्णतः वाकल्याचे निदर्शनास यायला लागले. अशा परिस्थितीत या देशाला पुनश्च नवसंजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून ऋषी व कृषींचे संयुक्त मेळावे होणे काळाची गरज असल्यामुळेच आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ या ठिकाणी ऋषी व कृषी चा अनोखा संगम पाहण्याकरिता मिळाला.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय संचालकांच्या उपस्थितीत ज्ञानेश आश्रमाचे अध्यक्ष भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचा छोटेखानी हृद्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड गजाननराव पुडकर उपाध्यक्ष अॅड जयवंतराव उपाख्य भैय्यासाहेब पाटील पुसदेकर उपाध्यक्ष केशवराव मेतकर उपाध्यक्ष सुरेशदादा खोटरे कार्यकारिणी सदस्य प्रा सुभाषराव बनसोड कार्यकारिणी सदस्य विजय ठोकळ स्विकूत सदस्य शेषराव खाडे माजी सचिव, प्राचार्य नंदकिशोर चिखले बाळासाहेब पाटील साहेबराव सोनमाळे दादासाहेब पाटील सुरेश पाटील आढे रमेशभाऊ कोकाटे दिनकरराव जायले मधुसूदन खोटरे नारायण देवतळे,सुधीर बापू देशमुख गोपाळ येऊल पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच अमरावती व अकोट तेल्हारा येथील आजिव सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती उपस्थित होते कार्यक्रम चे प्रास्ताविक प्राचार्य डॉ गोपाल ढोले सर यांनी केले आहे तर सुत्रसंचलन शांतीकुमार प्रभाकरराव सावरकर यांनी केले आहे सर्व उपस्थित मान्यवर मंडळी चे आभार अंकेश विलासराव भाबुरकर यांनी व्यक्त केले आहे
कूषी अभ्यास दौरा मेळावा उत्साहात संपन्न झाला आहे