
राजकुमार चिंचोळकर
बाळापूर
तालुक्यातील वाडेगाव तामसी पिंपळगाव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले मात्र सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिक रस्त्यावर येऊन तासभर काम थांबविले . उपरोक्त रस्त्याचे काम झाल्यावर अल्पावधीतच रस्ताची दुरवस्था झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे तामसी येथील उपसरपंच तसेच नागरिकांनी संमधीताकडे तक्रार सादर करून रस्ता दुरुस्तीची मागणी नुकतीच करण्यात आली होती. तर वाडेगाव तामसी पिंपळगाव अंदाजे पाच किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दोन दिवसांपासून. सुरू झाले मात्र होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने तामसी पिंपळगाव येथील नागरिकांनी रस्त्यावर येऊन सुरू असलेले काम थांबविले. दरम्यान संमधीत ठेकेदार मुळे व डेप्युटी इंजीनियर एस. एन. बोचे उपस्थित झाले त्यावेळी उपस्थित नागरिकांनी सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामा संदर्भात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. तसेच निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. जवळपास एक तासभर झालेल्या चर्चेअंती रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी पिंपळगाव चे सरपंच प्रथमेश महानकार .रुषीकेश वानखेडे.पवन गावंडे. तसेच तामसी येथील भगवान पातोंड . सुनील मोरे. विद्याबाई पातोडे . रामदास बोरसे. पदमा पातोडे . विक्की गिते. प्रतिभा काळे. विजय पातोडे सह तामसी पिंपळगाव येथील नागरिक तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.