
तेल्हारा तालुका प्रतिनिधी :-.नंदकिशोर नागपुरे
तेल्हारा तालुक्यातील क्रमांक एकची असलेली ग्राम पंचायत दानापुर येथे दिनांक१९/0२/२०२६ रोजी छात्रपति शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी. ग्रा.पं.सरपंच सौ.सपना धम्मपाल वाकोडे ह्या होत्या.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छात्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रा.पं.लिपिक अशोक राहणे यांनी आजच्या दिनाचा उद्देश्य प्रतिपादन केले. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन छात्रपति शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.या जयंती सोहळ्याचे सुत्रसंचलन पांडुरंग मानकर,पाणी पुरवठा ग्रा.पं.कर्मचारी यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अविनाश जामोदकर,गणेश खडसान,रामु हागे,यांनी परिश्रम घेतले,यावेळी ग्रामपंचायत माजी.उपसरपंच साहेबराव वाकोडे,भगवान हागे पत्रकार, योगेश येऊल मा. ग्रा.पं.सदस्य,अमोल गौर (कोतवाल),धम्मपाल वाकोडे,नंदकिशोर नागपुरे पञकार व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.