
तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास गावंडे मुख्याध्यापक हे होते तर अतिथी म्हणून शांतीकुमार सावरकर सुनील वंजारी शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते विशेष शिव विचार वक्ते म्हणून कु शिवराई अंकेश भांबुरकर कु शेजल परनाटे कु साची हेरोडे कु सोनल वाघमारे उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थित मान्यवर मंडळी नी जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज व शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन केले आहे तसेच छञपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आरती सोहळा साजरा करण्यात आला आहे.यावेळी वेशभूषा सादरीकरण करण्यात आले आहे यामध्ये कु श्रावणी इंगळे,कु इशिता भोजने कु ज्ञानेश्वरी गोठकडे,अंकीता सिरसाट, पूर्वी दामोदर,कु दिक्षा पोहरकार, यांनी सहभाग घेतला आहे तसेच विविध नूत्य सादर केले आहेत.
कार्यक्रम चे सुञसंचालन बळीराम कुवारे सर यांनी केले आहे तर आभार प्रदर्शन रूपचंद गाढवे सर यांनी केले आहे यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.