
शेगाव प्रतिनिधी :- प्रभुदास पारस्कर
शेगाव :- शेगाव नगरपरिषद निवडणुकीत चुरशी लढतीत काँग्रेसचे प्रकाश एकनाथ शेगोकार यांनी नगराध्यक्ष पदावर विजय संपादन केला आहे. एकूण 14414 मते मिळाली. नगरपरिषद एकूण 30 सदस्यांपैकी सभागृहात भाजपा ने 15 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. पक्षीय बलाबल पाहता भाजप 15, काँग्रेस 5, एमआयएम 4, शिवसेना 2, वंचित बहुजन आघाडी 2, शिवसेना (उबाठा) 1 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आले आहे.
प्रभागनिहाय निकालात प्रभाग 1 मधून भाजपाच्या पुजा सचिन खानापुरे व काँग्रेसचे शिवाजी उमाकांत बूरुंगुले विजयी झाले.
प्र 2 मध्ये भाजपाच्या वैशाली प्रमोद सुळ आणि विनोद अशोक मसने यांनी यश मिळवले. प्र 3 मधून शिवसेनेच्या कांचन शैलेश डाबेराव आणि भाजपाचे आकाश मोहन नावकार विजयी झाले. प्र 4 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सीमा प्रमोदकुमार ओवे आणि अपक्ष महेश हरी काळे यांनी बाजी मारली. प्र 5 आणि 6 मध्ये भाजपाचे वर्चस्व राहिले असून पल्लवी मोहन बानोले , पवन भिकुलाल शर्मा , लिना रविकांत पाटील आणि शरदकुमार शंकरलाल अग्रवाल विजयी झाले आहेत.
प्र 7 मध्ये काँग्रेसचे पूर्ण वर्चस्व पाहायला मिळाले, जिथे प्रमोद बळीराम इंगळे आणि शेख सना परवीन शेख राजीक निवडून आले. प्रभाग 8 मध्ये भाजपाचे रमेश गुलाबराव मोहड मते आणि अलका संजय खानजोडे विजयी झाले. प्र 9 मध्ये भाजपाच्या सुषमा राजेंद्र भिसे आणि काँग्रेसचे आनंदकुमार रतनलाल अग्रवाल विजय मिळवला. प्र 10 मध्ये भाजपाचे मालती मंगेश ढगे आणि अंकुश विजयराव देशमुख निवडून आले. प्र 11 मधून काँग्रेसचे रविंद्र हरिदास उमाळे आणि भाजपाच्या सुचिता संदिप काळे विजयी झाल्या.
प्र 12 आणि 13 मध्ये एमआयएम पक्षाने वर्चस्व राखले असून शेख मुख्तार शेख बुडन , रेहाना बी मोहम्मद साजिद , शेख मदीनाबी शेख जब्बार आणि मुहम्मद नदीम अब्दुल कादर चारही उमेदवार विजयी झाले. प्र 14 मध्ये शिवसेना (उबाठा) चे आशिष दामोदर गणगणे आणि शिवसेनेच्या मिनाक्षी सेतोष घाटोळ यांनी यश मिळवले. शेवटच्या प्र 15 मध्ये भाजपाच्या सुषमा नितीन शेगोकार आणि वंचित बहुजन आघाडीच्या केसरबाई राजाराम घुले विजयी झाल्या आहेत.