
धिरज बजाज हिवरखेड प्रतिनिधी :-
हिवरखेड नगरपरिषद च्या निकालानंतर भाजपचाच गुलाल उधळला असून नगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ. सुलभाताई रमेश दुतोंडे ह्या विजयी झाल्या असून 20 पैकी 11 नगरसेवक पदे जिंकून भाजपा ने हिवरखेड नगर परिषदेवर एकहाती सत्ता काबीज केली आहे.
पंचवीस वर्षाच्या संघर्षानंतर हिवरखेड नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाबाबत मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. दोन डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर तब्बल वीस दिवस मतदारांना निकालाची वाट पहावी लागली. 21 डिसेंबरच्या निकालानंतर हिवरखेड चे 21 भाग्यवान शिलेदार विजेत्यांची नावे समोर आली आहेत. आता गल्ली ते दिल्ली म्हणजेच नगरपरिषद सोबतच आमदार, खासदार, पालकमंत्री, राज्य सरकार, मुख्यमंत्री, केंद्र सरकार प्रधानमंत्री असे सर्वत्र भाजपचीच सत्ता असल्याने हिवरखेड शहर विकासाच्या बाबतीत कोठेही मागे राहणार नाही अशी अपेक्षा जनता बाळगून आहे.
प्रतिक्रिया
हिवरखेड नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षपदी निवडून येण्याचा बहुमान मिळवून दिल्याबद्दल सर्व मतदारांचे जाहीर आभार व्यक्त करते. आणि सर्व नागरिकांच्या भावनांचा आणि मागण्यांचा आदर करून सर्वांच्या सहकार्याने हिवरखेड विकासाच्या दिशेने अग्रेसर राहील याची ग्वाही देते…
सौ. सुलभा दुतोंडे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष हिवरखेड
हिवरखेड नगरपरिषद मध्ये मतदारांनी शिवसेना प्रहार युतीला विरोधी पक्षात बसण्याचा दिलेला कौल आम्ही मान्य करतो. आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आणि पाच नगरसेवक निवडून आले त्यामुळे जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी ठरवून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका आम्ही बजावणार आहोत… रवी राणा घुंगड नगरसेवक (शिवसेना शिंदेगट व प्रहार युती)
पक्षनिहाय विजयी उमेदवार
नगराध्यक्ष :- सौ. सुलभा रमेश दुतोंडे (भाजप)
१-अ सौ. वंदना राजेश वानखडे (भाजप)
१-ब दानिश खाँ रसुल खाँ भाजप
२-अ सौ. सविता सुनिल इंगळे
(वंचित बहुजन आघाडी)
२-ब आजम खान सुबेदार खान
(AIMIM)
३-अ सौ. प्रतिभा विरेंद्र येऊल (भाजप)
३-ब रामेश्वर पुंडलीक हागे (शिवसेना)
४-अ सौ. शितल प्रमोद पोके (शिवसेना)
४-ब ऋषीकेश श्रीकृष्णा पंचबुध्दे (शिवसेना)
५-अ सौ. प्रमिला रविंद्र मानकर (भाजप)
५-ब रवी (राणा) मधुकर घुंगड (शिवसेना)
६-अ दिपक बाबन रायबोले (भाजप)
६-ब सौ. अनिता रविंद्र वाकोडे (भाजप)
७-अ सौ. वैशाली गणेश वानखडे (भाजप)
७-ब अजीज खाँ जमीर खाँ (भाजप)
८-अ सौ. दिपाली संदिप इंगळे
(भाजप)
८-ब वैभव रमेश गावंडे (भाजप)
९-अ प्रथमेश श्रीराम नाठे (भाजप)
९-ब जयश्री महादेव गावंडे (शिवसेना)
१०-अ नादिया अंजुम नसीम खान (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस)
१०-ब रुबीनाज अब्दुल सलमान
(भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस)
नगरपरिषद हिवरखेड पक्षीय बलाबल
नगराध्यक्ष..
सौ सुलभाताई रमेश दुतोंडे भाजप
सदस्य पक्षनिहाय संख्या
भाजप-11
शिवसेना-05
भा.रा.काँग्रेस-02
वंचित बहुजन आघाडी-01
AIMIM-01