
तेल्हारा ता. प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे
सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढत असून रखरखत्या उन्हात सर्वसामान्यांची लाहीलाही होत आहे. पूर्वी गावोगावी तहानलेल्या प्रवाशांसाठी पाणपोई लावली जात असे, मात्र काळाच्या ओघात ही माणुसकीची परंपरा हळूहळू लोप पावत चालली आहे. अशा परिस्थितीत, तेल्हारा तालुक्यातील कोठा येथे लोकजागर मंच आणि ग्रामपंचायत यांनी आपला सामाजिक वारसा जपत यावर्षीही पाणपोई सेवा सुरू केली आहे.
प्रवाशांना मोठा आधार
कोठा येथील दीपक अहेरकर यांच्या घरासमोर ही पाणपोई दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटण्यात आली आहे. मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आणि वाटसरूंची तहान भागावी, या उदात्त हेतूने लोकजागर मंच व ग्रामपंचायत कोठा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जातो. अनेक ठिकाणी पाणपोयांची संख्या कमी होत असताना, कोठा ग्रामस्थांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरत आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
या पाणपोईचे रीतसर उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने
हरिभाऊ गावंडे उपसरपंच, ग्रामपंचायत कोठा
दीपक अहेरकर सदस्य, ग्रामपंचायत
विश्वासराव अहेरकर प्रतिष्ठित नागरिक
पंजाबराव अहेरकर
माधवराव विखे
संदीपराव अहेरकर
सोपान अहेरकर
सत्यविजय अहेरकर
या सर्वांच्या उपस्थितीत हा जलसेवेचा उपक्रम मार्गस्थ करण्यात आला. दुसऱ्याची तहान भागवणे हे सर्वात मोठे पुण्य आहे, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे कोठा परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे