
भिमकिरण दामोदर:- हाता प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यात ग्राम मोखा या गावात आज एक ऐतिहासिक धम्म सोहळा संपन्न .मोखा येथील त्रिमूर्ती बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्ध मूर्तीची स्थापना व भिक्खू संघाची जाहीर धम्म देशना पार पडली .आज ३१ मार्च २०२६, सकाळी ७ वाजतापासून मोखा येथे धम्ममय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात होऊन भगवान बुद्धाच्या मूर्तीची धम्म रॅलीने झाली. ९ वाजता पंचशील ध्वजारोहण आणि त्रिशरण, पंचशील घेऊन कार्यक्रम करण्यात आली .मुख्य आकर्षण म्हणजे १० वाजता तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. या कार्यक्रमासाठी पूज्य भिक्खू धम्मपालजी महाथेरो भिमटेकडी हिंगणी ह्यांनी करून उपस्थितना धम्मदेशना दिली
व उपस्थितना भोजन दान दिले
मंचावर
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ मयुरी श्रीहर्ष खरप ( सरपंच) मोखा तर मुर्ति दान दाते रामदास शामराव अमझरे तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्य अध्यक्ष प्रमोद देंडवे बबलु सिरसाट संजय बावणे सुभाष शेगोकार डॉ पाटील राहुल इंगळे सुभाष तायडे दिपक घ्यारे सुनील मोरे इंदुबाई वानखडे नारायण मोरे
उपस्थित होते
भगवान गौतम बुद्ध हयांचे जीवनावर प्रकाश टाकत अनेकांनी मार्गदर्शन केले
तर मोखा व परिसरातील शेकडोंच्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका संघ कार्यक्रमात सहभागी झाले
कार्यक्रम आयोजक प्रकाश वानखडे
गणेश बागडे भास्कर तायडे बाळू शेगोकार बाबाराव बागडे प्रदीप बागडे विलास वानखडे जीवन तायडे संजय तायडे व महिला उपासिका संघ बौद्ध पंच मंडळ व जिव्हाळा मित्र मंडळ हयांचे मोलाचे सहकार्य लाभले