
अनंता मते- तालुका प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी: देशात दरवर्षी २३ मार्च हा ‘शहीद दिवस’ म्हणून पाळला जातो. भारत मातेचे विर सुपुत्र क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इंग्रजांविरुद्ध बंड करून ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची गोळ्या घालून हत्या केली. ब्रिटिश सरकारणे शिक्षा म्हणून सन १९३१ मध्ये याच दिवशी त्यांना लाहोर तुरुंगात फाशी दिली. तरुणांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या बलिदानाने देशात क्रांतीची लाट निर्माण केली. सदर तीनही क्रांतिकारक देशाच्या तरुण पिढीसाठी आजही प्रेरणास्रोत आहेत. या वीरपुत्रांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस शहीद दिवस म्हणून संपूर्ण देशात पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी येथे सुदृढ कार्यप्रणाली समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यामाने आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रा.डॉ.ताई उके, डॉ.सत्येंद्र गडपायले, प्रा.सुरेंद्र किन्हीकर, सुदृढ कार्यप्रणाली समिती समन्वयक डॉ.संगीता छाबा तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.नितीन घोडीले व डॉ.ममता येवतकर आदींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमा दरम्यान शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या कार्याचे वैचारिक मंथन करण्यात आले. कार्यक्रमदरम्यान डॉ.गडपायले यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता डॉ. समीर बिजवे, प्रा.भारती कोरडे, प्रा.आशा बाणाईत व डॉ.सुवर्णा झिलपे आदींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता डॉ.विवेक पाटील, डॉ.चतुरानंद केदार, श्री.संतोष सरोदे व श्री.प्रशांत नांदुरकर आदींचे तसेच रासेयो स्वयंसेवक कु.क्षितिजा जैन, अविनाश वानखडे, भार्गवी सरकटे, प्रतिक्षा पवार, तृप्ती खराट तसेच पूर्वी थोरात आदींचे सहकार्य लाभले.