
तेल्हारा प्रतिनिधी :
सामाजिक वनीकरण व श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांती कुमार सावरकर प्रभारी मुख्याध्यापक हे होते तर अतिथी म्हणून शेगोकार साहेब,पराते साहेब, शैलेश भगत, सामाजिक वनीकरण विभाग अंकेश भांबुरकर हरित क्रांती सेना प्रमुख,कु प्रियंका नंदाने मॅडम भारत भोवर उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांना चिमणी दिनाचे महत्त्व व पक्ष्यांचे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याकरता अशी सोय करावी यासंबंधीची सखोल माहिती सामाजिक वर्गीकरण यांनी दिली आहे तसेच पक्षांना पिण्याच्या पाण्याकरता झाडांना मातीची भांडी बांधून पाण्याची व्यवस्था कशी करावी यासंबंधी माहिती दिली आहे व शाळेतील परिसरात पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षित फोकमारे वर्ग 8वा यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार कु अंजली गव्हांदे वर्ग नववा हिने मानले आहेत
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना विहित प्राण्यांचे मुखवटे देऊन पाण्यासंबंधीची जंगलामधील माहिती डिजिटल फलकावर दाखवण्यात आली पट्टेदार वाघाची माहिती व त्याची दैनंदिन हालचाल अस्वल व इतर प्राण्यांची पण माहिती दिली त्यापासून कशी सुरक्षित करावी याचे पण प्रशिक्षण दिले यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते
अंकेश भांबुरकर हरित क्रांती सेना प्रमुख यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना आंमञित केले होते