
आकोट प्रतिनिधी :-सतोष विणके
अकोट श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज यांचा १०९ वा जन्मोत्सव भक्ती भावपूर्ण संपन्न झाला.राज्यभरातून आलेल्या वासुदेव भक्तांच्या उपस्थितीने संतनगरीला ‘अवघी अवतरली पंढरी’ असे भक्तीमय स्वरुप आले होते.हजारो भाविक गुरु श्रींचे मनोभावे दर्शन घेवून धन्य झाले.
गुरुमाऊलींचा १०९ वा जयंती महोत्सव १३फेबुवारी पासून श्रद्धासागर येथे प्रारंभ झाला.या भक्ती सोहळ्याची पुर्णाहूती जन्मोत्सव सोहळ्याने झाली. जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ पहाटे ‘श्रीं’ च्या महाभिषेकाने झाला.संस्थाध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले यांचे हस्ते सपत्नीक अभिषेक पार पडला यावेळी संस्थेचे विश्वस्त महापूजेत सहभागी झाले होते.
संत नगरीअवघी दुमदुमली पंढरी
गुरुमाऊली जन्मोत्सवानिमित्त आयोजित गुरुमाऊली’ पालखी सोहळा उत्साहात पार पडला.दरम्यान गुरुवर्यांचे निवासस्थानी माधवराव मोहोकार ,पुरुषोत्तम मोहोकार यांनी पालखी रथाचे पुजन करुन महाआरती केली. यावेळी वासुदेव नगर,श्रद्धास्थळ रांगोळ्या,पताकांनी सुशोभित करण्यात आले होते.टाळ मृदंगाचे स्वरात नाचत गात अभंगाचे गायनाने संतनगरी दुमदुमून गेली.ॐवासुदेव नमो नमः,पुंडलिका वरदे ज्ञानबा तुकारामाचे गजरात पावल्या फुगड्या खेळत भक्तगण भक्तीरंगात न्हाऊन गेले होते.दिंडी मार्गावर शहरवासियांनी गुरुमाऊलींचे मनोभावे दर्शन घेतले..तर ठिकठिकाणी स्वयंसेवी व सामाजिक संस्था व युवक मंडळांनी पिण्याचे पाणी,शरबत,चहा,फराळाची उत्तम व्यवस्था केली व पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केले.
श्रीं’ च्या जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ गुरुपुजनाने झाला. ह भ प गोपाळ महाराज व संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांनी सपत्नीक गुरुपुजन केले तर संस्थेच्या विश्वस्तांनी सपत्नीक गुरुवंदना केली.वै. सुमनताई पोटे यांनी रचित व प्रा.प्रतिभा पवित्रकार वाघ यांनी स्वरबद्ध केलेल्या गुरुवंदनेच्या सुमधूर स्वरांनी वातावरण भारावून गेले होते.
शिवसेना नेते दिलिप बोचे व सौ.विजया बोचे यांनी दरवर्षीप्रमाणे शिर्डी येथून आणलेला एक हजार गुलाबपुष्पांचा हार गुरुमाऊलींना अर्पण केला.
प्रेमाच्या शिदोरीचा काला करा! गोपाळ महाराज
गुरुवर्य वासुदेव महाराज जयंती महोत्सवाने नवी उर्जा मिळते. श्रद्धासागरातील श्रद्धा,भक्ती आणि ज्ञानाचा त्रिवेणी संगम अलौकिक आहे.ही पुण्यभूमी आहे.येथील मातीच्या कणा कणात चैतन्य वास करते. गुरुवर्य महाराज हे सर्वात्मक ईश्वर आहेत .सद्गुरुंवर श्रद्धा व निष्ठा ठेवून धन्य व्हा. यांनी यावेळी हितोपदेश दिला.
गुरुमाऊली जयंती महोत्सवाची काल्याचे किर्तनाने झाली.काल्याचे महात्म सांगतांना कृष्णलिलांची महत्ती त्यांनी सांगितले.
दरम्यान तिर्थस्थापनेचे उद्यापन संस्थेचे सचिव रविंद्र वानखडे यांचे हस्ते झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ माया म्हेसने व राममूर्ती वालसिंगे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव रविंद्र वानखडे यांनी केले.
ह.भ.प.अंबादास महाराज मानकर यांचे मार्गदर्शनाखाली हा भक्ती सोहळा पार पडला. या साठी सर्वच महाराज मंडळी, वासुदेव भक्तगण,महिला सेवागट, युवक कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.महाप्रसादाने या भक्ती सोहळ्याची सांगता झाली.५० हजारावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने घेतला.
परमेश्वराचे साकार स्वरुप संत जितेद्रनाथ महाराज।
संत वासुदेव महाराज भगवंत स्वरुपच होते आणि परमेश्वराचे साकार स्वरुप म्हणजे संत वासुदेव महाराज. संत वासुदेव महाराजांचे अलौकिक निर्वाण असुन महाराज सगुण निर्गुनाच्या पलिकडचे होते.
विश्व धर्माचं कल्याण करणारे ठिकाण म्हणजे श्रद्धासागर असल्यामुळे त्याला कल्याण सागरही म्हणणे वावगे होणार नसल्याचे प्रतिपादन जितेंद्रनाथ महाराजांनी केले.
जितेंद्रनाथ महाराजांच्या हस्ते रिंगण सोहळ्यासाठी आलेल्या अश्वांचे पुजन व गुरुमाऊली पुजन करण्यात येऊन त्यांनी याप्रसंगी आशीर्वचनपर भाविकांशी संवाद साधला.
त्यांचा संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गुरुवर्य गोपाळ महाराजांचा अमृत महोत्सवी सत्कार*
वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू गुरुवर्य श्री गोपाळ महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले. मानपत्राचे वाचन संस्थेचे विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर यांनी केले
उत्कृष्ट वारकरी दिंडी पुरस्कार
गुरु माऊलींच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित भव्य वारकरी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या उत्कृष्ट दिंडीधारकांचा याप्रसंगी शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळ रोहनखेड व नंदीकेश्वर भजनी मंडळ पुंडा यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरस्काराने गौरवण्यात आले दिंड्यांचे परिक्षण जयकृष्ण वाकोडे, गजाननराव दुधाट,अतुल महाराज बोर्डे यांनी केले.
दिंडीधारकांना टाळ मृदंग व साहित्य वाटप*
दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांचे ईश्वर चिट्ठीने दहा दिंड्यांची निवड करून त्यांना टाळ मृदुंग व विणा वाटप करण्यात आले
माऊलींच्या अश्वांचा रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले*
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार येथील अश्वांचा रिंगण सोहळा भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडून गेला
शिवाजी चौक ते पोलीस स्टेशन व नंदीपेठ येथे उभे रिंगण व श्रद्धासागर परिसरात गोल रिंगण पार पडले रिंगण दृष्य पाहतांना भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
संस्थेचे उपाध्यक्ष बाबाराव बिहाडे व व महादेवराव ठाकरे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजूरकर सचिव रवींद्र वानखडे सहसचिव अवि गावंडे व मोहनराव पुं. जायले, डॉ अशोकराव बिहाडे, सौ सुनंदा आमले, दिलिप हरणे, जयदीप सोनखासकर, प्राचार्य गजाननराव चोपडे, अशोकराव पाचडे, पुरुषोत्तम मोहोकार, ॲड. शिरिष ढवळे, अनिल कोरपे, गजानन दुधाट, केशवप्रसाद राठी आदी यांनी कार्य कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पडली तर विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, गुजराती शिंपी समाज, जिजाऊ ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड मनस्विनी महिला मंच ,मराठा महिला मंडळ ,जिजाऊ मराठा महिला मंडळ, पाटील महिला मंडळ स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल प्रथमेश एक्वा तथा गाव गावच्या महिला सेवा गट व व वासुदेव भक्त व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.